भारत कन्झमशन स्कीम

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने आयसीआसीआय प्रुडेन्शियल भारत कन्झमशन स्कीम बाजारात आणली आहे. म्युच्युअल फंडातील ही योजना 9 एप्रिल पर्यंत खुली आहे. भारताची लोकसंख्या आणि भारतीय बाजारपेठेतील नियमित गरजांच्या वस्तूंची विक्री वाढत आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्याचा फायदा घेण्याच्यादृष्टीने ही योजना तयार करण्यात आली आहे. गेल्या दशकात कमी व्याजदरांमुळे आणि ग्राहकांना सहजपणे कर्ज उपलब्ध होत असल्याने अन्नधान्य वगळता अन्य नियमित गरजांच्या वस्तूंच्या विक्रीत देशभरात मोठी वाढ झालेली आहे.

जगात भारतात सर्वाधिक तरुण लोकसंख्या असल्याने ग्राहकपयोगी आणि किरकोळ विक्रीच्या बाजारपेठेची वाढ होण्याची मोठी क्षमता आहे. त्याचबरोबर मागील पिढीच्या तुलनेत तरुण पिढीच्या जीवनशैलीबाबतच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याने विक्रीचा नवा पॅटर्न उदयास आला आहे. सुविधा आणि सुखसोयी तसेच ब्रँड निवडीला नव्या पिढीकडून पसंती देण्यात येते. त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटाचा होणारा विस्तार, वाढते नागरीकरण, तंत्रज्ञान तसेच दळणवळणाच्या वाढत्या सुविधा यामुळे नियमित गरजेच्या वस्तूंची विक्री वाढत आहे. यासगळ्याचा विचार करून भारत कन्झमशन स्कीम बाजारात आणण्यात आली आहे. रजत चांडक आणि धर्मेश कक्कड हे फंड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. कमीत कमी पाच हजार आणि त्यापुढे एक रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.