नवी दिल्ली – लडाख सीमेवर भारत-चीन भारत-चीन संघर्षामुळे व्यापारी संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने देशामध्ये चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ५००हुन अधिक उत्पादकांचा समावेश करण्यात आला आहे.
सीएआयटीने म्हंटले कि, चीनला संधी मिळाल्यावर ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देतात. आणि ही वृत्ती देशाच्या हिताच्या विरोधात आहे. यामुळेच चिनी उत्पादनांचा बहिष्कार आणि भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएआयटीने ‘भारतीय सामान, हमारा अभिमान’ या अभियानाअंतर्गत 500 हून अधिक कॅटेगरीतील उत्पादनांची यादी जाहीर केली आहे.
या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जाईल
या यादीमध्ये खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक्स, वस्त्रोद्योग, बिल्डर हार्डवेअर, पादत्राणे, वस्त्रे, स्वयंपाकघरातील वस्तू, सामान, हँडबॅग्ज, सौंदर्यप्रसाधने भेट वस्तू, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, फर्निचर, आरोग्य उत्पादने, पॅकेजिंग उत्पादने, ऑटो पार्ट्स, दिवाळी आणि होळी आयटम, चष्मा इ. वस्तूंचा समावेश केला आहे.