-->

India-China clash : भारत चीन सैन्यात पुन्हा ‘धुमशान’; 20 चीनी सैनिक तर चार भारतीय सैनिक जखमी

नवी दिल्ली – भारत आणि चीनच्या लष्करात पुन्हा एकदा धुमशान उडाली. त्याच चीनचे 20 तर भारताचे चार जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्करी कमांडर पातळीवरील चर्चेची नववी फेरी सुरू होण्याआधी दोन दिवस ही धुमशान घडल्याचे समजते.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी सिक्कीमच्या नाकुला भागात घुसखोरी करत सीमा बदलण्याच प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय जवानांनी हा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर परिस्थितीत कमालीचा तणाव निर्माण झाला होता, पण आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पूर्व लडाखमधील सर्व ठिकाणांहून दोन्ही बाजूंनी सैन्य माघारी घेण्याबाबात लष्करी कमांडर पातळीवरील चर्चेची नववी फेरी सोमवारी सलग 16 तास चर्चेनंतर संपली, असे पीटीआयच्या वृत्ता म्हटले आहे.

सैन्य माघारीची प्रक्रिया दोन्ही बाजूने एकाच वेळी सुरू करावी, त्यात कोणत्याही ठिकाणांचा निवडकपणा चालणार नाही, असे या चर्चेत भारताने स्पष्ट केले. चीन आणि भारत यांच्या गेल्यावर्षी मे महिन्यात तणाव कमालीचा वाढला होता. त्यावेळी भारतीय 20 जवान शहीद झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.