भारताचे बांगलादेशसमोर १७५ धावांचे आव्हान

नागपूर : भारत-बांगलादेश यांच्यातील तिस-या आणि निर्णयाक टी-२० सामन्यात श्रेयस अय्यर आणि के एल राहूल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेश समोर विजयासाठी १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७४ धावा केल्या आहेत.

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. दुस-या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेला सलामीवीर रोहित शर्मा आजच्या सामन्यात केवळ २ धावांवर बाद झाला.

त्यापाठोपाठ शिखर धवनसुध्दा १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केल्या. के एल राहुलने ३५ चेंडूत ७ चौकारासह ५२ तर श्रेयस अय्यरने तडाखेबंद फलंदाजी करत ३३ चेंडूत ३ चौकार व ५ षटकांरासह ६२ धावा केल्या. त्यानंतर आलेला ञषभ पंत केवळ ६ धावांवर बाद झाला. मनीष पांडेने १३ चेंडूत २२ धावा करत संघाची धावसंख्या १७४ पर्यंत नेली.

बांगलादेशकडून गोलंदाजीत शफीउल इस्लाम आणि सौम्य सरकार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अल-अमीन होसैन याने १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.