तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक

अंताल्या (तुर्की) – रजत चौहान, अभिषेक वर्मा व अमन सैनी या पुरुष कम्पाऊंड संघाने शनिवारी तिरंदाजी विश्‍वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत भारताला एकमेव कांस्यपदक मिळवून दिले. भारताच्या या तीन खेळाडूंनी रशियाच्या एंटन बुलाएव, अलेक्‍झॅंडर दाम्बाएव व पावेल क्रिलोव्ह यांचा समावेश असणाजया संघाला कास्यपदक प्ले ऑफमध्ये 235-230 गुणांनी पराभूत केले.

भारताचा महिला संघही कास्यपदकाच्या शर्यतीत होता. मात्र ज्योती सुरेखा वेनाम, मुस्कान किरार व स्वाती दुधवाल यांना इंग्लंडच्या लैला एनिसन, इला गिब्सन व लुसी मेसन यांच्या संघाने 226- 228 गुणांनी पराभूत केले. भारतीय तिरंदाज रिकर्व्ह प्रकारात आपली छाप पाडू शकले नाहीत. भारताला या प्रकारात एकही पदक मिळाले नाही. नेदरलंडमध्ये होणाजया जागतिक चॅम्पियन स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता फेरी असेल. या स्पर्धेपूर्वीची ही विश्वचषक स्पर्धेतील तिसरी व अंतिम फेरी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.