स्टॉकहोम : भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी, त्यांची पत्नी इशर डफ्लो आणि मायकेल खेमेर यांना संयुक्तपणे 2019चे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक दारीद्य्र निर्मूलनाच्या प्रयोगशील दृष्टीकोनासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
या संशोधकांच्या संशोधनामुळे जागतिक दारीद्रयाविरोधातील लढ्यास बळ मिळाले आहे. त्यांच्या प्रयोगशील दृष्टीकोनामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी आली. ती आता संशोधनात परावर्तीत झाली, असे नोबेलच्या समितीने निवेदनात म्हटले आहे.
बॅनर्जी (वय 58) यांचे शिक्षण कोलकाता विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि हार्वड विद्यापीठात झाले. तेथे त्यांनी पी.एचडी. मिळवली. मॅस्साचेटस इस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ते फोर्ड फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आहेत. बॅनर्जी यांनी डफ्लो यांच्यासह अन्दुल लतीफ कमील पॉव्हर्टी ऍक्शन लॅबची स्थापना केली.