#NZvIND – ‘रोहित-ऋषभ’च्या तडाख्यासमोर न्यूझीलंड बेचिराख

-दुसऱ्या सामन्यात भारताचा 7 गडी राखून विजय

-तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी

-10 वर्षांनंतर भारताचा पहिला टी-20 विजय

ऑकलंड  – भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सात गडी आणि सात चेंडू राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे मालिका विजयासाठी आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 158 धावांची मजल मारत भारता समोर विजयासाथी 159 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना भारतीय संघाने हे आव्हान 19.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 162 धावांची मजल मारत सामना आपल्या नावे केला.

159 धवांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने वेगवान सुरूवात केली. पहिल्या षटकापासूनच रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. ज्यामुळे पहिल्या 6 षटकांतच भारताने आपले अर्धशतक फलकावर लगावले. यावेळी एकाबाजुने रोहित फटकेबाजी करत होता. तर, शिखर धवन सावधपणे फलंदाजी करत त्याला साथ देण्याचे काम करत होता. त्यामुळे पॉवरप्ले मध्त्ये भारतीय सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, फटकेबाजी करणाऱ्या रोहितने 28 चेंडूत आपले सतरावे अर्धशतक झळकावले. मात्र, यानंतरच्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो टीम साऊदीकडे झेल देऊन परतला. बाद होण्यापुर्वी त्याने शिखर धवन सोबत 9.2 षटकांत 79 धावांची भागिदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर फटकेबाजी करण्याच्या नादात धवनही परतला. त्याने 31 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 30 धावांची खेळी केली.

दोन्ही सलामीवीर परतल्यानंतर ऋषभ पंत आणि विजय शंकरयांनी धावगती कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजय शंकर 8 चेंडूत 14 धावा करुन परतला. यानंतर आलेल्या धोनीच्या साथीत ऋषभने फटकेबाजी सुरू ठेवत आवश्‍यक धावगती कायम राखत विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली. तर, दुसऱ्या बाजुने अनुभवी धोनीने देखील वेगाने धावा बनवत त्याला सुरेख साथ दिली.

विजयासाठी एक धाव आवश्‍यक असताना ऋसभने चौकार खेचत संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला. यावेळी ऋाषभने नाबाद 40 तर धोनीने नाबाद 20 धावांची खेळी करत चौथ्या गड्यासाठी नाबाद 44 धावांची भागिदारी केली. यावेळी न्यूझीलंडकडून लोकी फर्ग्युसन, इश सोधी आणि डेरिल मिशेलयांनी प्रत्येकी एक एक बळी मिळवला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मागच्या सामन्यात धावांची बरसात करणारे न्यूझीलंडचे सलामीवीर कॉलिन मुन्‍रो आणि टीम सेयफर्ट आजच्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर चाचपडताणा दिसून आले. यावेळी, मागच्या सामन्याचा सामनावीर सेयफर्टला 12 धावांवर बाद करत भुवनेश्‍वरने पहिला बळी मिलवून दिला. तर, मुन्‍रोला बाद करत क़ृनालने भारताला दुसरा बळी मिलवून दिला. यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यम्सन आणि डेरिल मिशेलला बाद करत कृनालने न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले.

कृणाल पांड्याने दिलेल्या पाठोपाठच्या तीन धक्‍यानंतर मैदानावर आलेल्या रॉस टेलर आणि ग्रॅंडहोम यांनी त्यांचा डाव सावरला. ग्रॅंडहोमने तडाखेबाज फलंदाजी करत अधर्शतक झळकावले. त्याने 27 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने रॉस टेलर त्याला चांगली साथ देत होता.

अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच ग्रॅंडहोम माघारी परतल्याने त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला. रॉस टेलरने ही मंदावलेली धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केले. पण, तो 45 धावा करुन बाद झाला. दुसरा सेट झालेला फलंदाज बाद झाल्याने न्यूझीलंड 20 षटकांत 158 धावांपर्यंतच मजल मारु शकला. यावेळी कृनाल पांड्याने तीन तर खलील अहमदने 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड 20 षटकांत 8 बाद 158 (कॉलिन डी ग्रॅंडहोम 50, रॉस टेलर 42, कृनाल पांड्या 28-3, खलील अहमद 27-2) पराभूत  विरुद्ध  भारत 18.5 षटकांत 3 बाद 162 (रोहित शर्मा 50, ऋषभ पंत नाबाद 40, महेंद्रसिंग धोनी नाबाद 20, लोकी फर्ग्युसन 31-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)