सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताची जपानवर २-० ने मात

सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताने चांगली सुरुवात करत जपानला २-० ने हरवले आहे. मुख्य प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने हा सामना खेळला. भारतीय संघातील वरुण कुमारने दुसऱ्या सत्रात २४ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरानंतर जपानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय संघाने त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी केले. त्यानंतरच्या पुढील खेळात सिमरनजीत सिंहने जपानी गोलकिपर योशिकावाला चकवत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानच्या संघाला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. पहिल्याच सामन्यात आशियाई खेळाचे विजेतेपद पटकावणाऱ्या जपानला चित केल्यामुळे भारतीय संघाचे मनोबल वाढणार आहे. भारताचा पुढील सामना दक्षिण कोरिया विरुद्ध होणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.