टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारताची बंदी

केंद्र सरकारने सोमवारी धडक पाऊल उचलत चिनी अ‍ॅप्समध्ये टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊजर, लाइकी आणि व्ही-चॅट या अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या इतर अ‍ॅप्समध्ये बायडू मॅप, शीन, क्लॅश ऑफ किंग, डीयू बॅटरी सेव्हर, हॅलो, लाइकी, यू कॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम बाॅवर्स, व्हायरस क्लिनर, एपीयूएस बाॅवर्स, रोमवूई, क्लब फॅक्टरी, न्यूज डॉग, ब्युट्री प्लस, वूई चॅट, यूसी न्यूज, क्यू क्यू मेल, वेईबो, झेंडर, क्यू क्यू म्युझिक, क्यू क्यू न्यूजफीड, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस 31.एमआय व्हिडीओ कॉल-शाओमी, वुई सिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, विवा व्हिडीओ-क्यूयू व्हिडीओ इन्क, मेईतू, विगो व्हिडीओ, न्यू व्हिडीओ स्टेटस, डीयू रेकॉर्डऱ, व्हॉल्ट हाईड, केश क्लिनर डीयू अ‍ॅपस्टुडियो, डीयू क्लिनर, डीयू ब्राऊजर, हॅगो प्ले विथ न्यू  फ्रडेंस, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर चिता मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यू क्यू प्लेअर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बायडू ट्रान्सलेट, वीमेट, क्यू क्यू इंटरनॅशनल, क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर, क्यू क्यू लॉंचर, यू व्हिडीओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ, मोबाईल लिजेण्ड, डीयू प्रायव्हसीचा समावेश आहे.

संबंधित अ‍ॅप्सवरील बंदीमुळे मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्या भारतीयांच्या हितसंबंधांचे रक्षण होईल. त्या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. संबंधित अ‍ॅप्स वापरणाऱ्यांच्या डेटाची चोरी केली जात आहे, अशा अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे बंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. संबंधित अ‍ॅप्स ब्लॉक करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालय आणि सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडूनही करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.