India-Bangladesh Government Crisis। बांगलादेशातील सत्तापालटानंतरच्या परिस्थितीवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्राने सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेत्यांना ही माहिती दिली. बांगलादेशमध्ये सध्या १२ ते १३ हजार भारतीय असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, देशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की आपल्या नागरिकांना तेथून बाहेर काढावे लागेल.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने बैठकीत , बांगलादेशातील प्रत्येक परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती कशीही असेल, त्याची माहिती विरोधकांना दिली जाईल. तेथून सुमारे 8000 भारतीय विद्यार्थी परतले आहेत. उर्वरित लोकांना बाहेर काढण्याची सध्या गरज नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच शेख हसीना यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारने उचललेल्या पावलांवर विरोधक समाधानी आहेत.
‘या’ नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला लावली हजेरी India-Bangladesh Government Crisis।
सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर प्रसाद यांनी सरकारची बाजू मांडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी, सपा खासदार राम गोपाल यादव यांच्यासह सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
Briefed an All-Party meeting in Parliament today about the ongoing developments in Bangladesh.
Appreciate the unanimous support and understanding that was extended. pic.twitter.com/tiitk5M5zn
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 6, 2024
जयशंकर प्रसाद यांनी ट्विट करून सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील परिस्थितीची माहिती दिली. या प्रकरणी विरोधकांकडून मिळालेल्या पाठिंब्याचे जयशंकर यांनी कौतुक केले आहे.
राहुल यांनी बैठकीत ‘हे’ प्रश्न विचारले India-Bangladesh Government Crisis।
बांगलादेशातील परिस्थितीमध्ये परकीय हात आहे का, ?असा सवाल राहुल गांधी यांनी बैठकीत केला. या परिस्थितीबाबत भारताकडे काही दीर्घकालीन योजना आहे का? बांगलादेशच्या नव्या सरकारबाबत भारताचा कृती आराखडा काय असेल? बैठकीत इतर पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले. मात्र, या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत, असे विरोधकांनी सांगितले.
हेही वाचा
बांगलादेशातील सत्तापालट झाल्यामुळे भारतावर होणार ‘हा’ परिणाम; काय असू शकतात आव्हाने?