भारत आणि पाकिस्तानची इच्छा असेल तरच मध्यस्थी करेन

काश्‍मीर प्रश्‍नावर अध्यक्ष ट्रम्प यांचे पुन्हा स्पष्टीकरण

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान यांनी सुचना केली तरच काश्‍मीर प्रश्‍नावर मध्यस्थी करण्यास आपली तयारी आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तथापी हा प्रश्‍न या दोन देशांनी आपसात चर्चा करून सोडवण्याला आपले प्राधान्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी काश्‍मीर प्रश्‍नात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. तथापी ट्रम्प यांची ही मध्यस्थीची सुचना भारताने फेटाळली होती तर पाकिस्तानने त्याचे स्वागत केले होते.

भारताने आपली ही मध्यस्थी नाकारली आहे त्यावर आपली प्रतिक्रीया काय असे विचारता ट्रम्प यांनी त्यांनी(भारताने) आपली ऑफर स्वीकारली आहे काय असा उलट सवाल केला. मोदी आणि खान ही फन्स्टास्टीक माणसे आहेत अशी शेरेबाजीही त्यांनी केली. ते म्हणाले की ते स्वताच त्यांच्या प्रश्‍नात मार्ग काढतील. पण त्यांना माझ्या मदतीचे आवश्‍यकता वाटत असेल तर मी ती देण्यास तयार आहे असे ते म्हणाले. मी भारताशीही त्या संबंधात बोललो आहे असे ते म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वताच आपल्याला काश्‍मीर प्रश्‍नात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती असा गौप्यस्फोट ट्रम्प यांनी त्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे भारतात मोठेच राजकीय वादळ माजले होते. भारत सरकारकडूनही याचा इन्कार करण्यात आला होता. पण आजच्या पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात ट्रम्प यांनी मोदींनी तशी ऑफर दिली होती काय यावर नेमके उत्तर देणे टाळले. मी खरेच त्यांच्याशी काश्‍मीर बाबत बोललो होतो एवढेच त्रोटक उत्तर त्यांनी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.