भारत आणि पाकिस्ताने संयम बाळगावा ; पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन 

भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांनी संयम बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम आणि शांतता पाळावी असा सल्ला दिला आहे.

भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले होते. यावेळी पाकिस्तानच्या सेना प्रवक्त्यांनी भारताचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. मात्र भारतीय संरक्षण मंत्रालयाने पाकचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

पाकिस्तानच्या हवाई दलांनी भारताचे दोन लढाऊ विमान पाडले असून एका वैमानिकाला जिवंत पकडल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु, पाकिस्तानच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिले आहे. भारतीय विमानांचे पाकमध्ये नुकसान झालेले नाही, असे स्पष्टीकरण सूत्रांनी दिले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×