#IPL2021 : सहा दिवसांचे विलगीकरण आवश्‍यक

मुंबई – इंग्लंडवरून भारत व इंग्लंड संघातील क्रिकेटपटूंना 19 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी किमान सहा दिवसांचे विलगीकरण आवश्‍यक आहे.

यासाठीच आयपीएल समितीने स्पर्धेत सर्व सहभागी संघांना त्यासाठी सूचना केल्या आहेत. इंग्लंडमधून अमिरातीत येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला संघात सामील होण्यापूर्वी सहा दिवसांच्या विलगीकरणातच राहावे लागेल, असे बीसीसीआयने सांगितले.

इंग्लंडला गेलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना बायोबबलमध्ये दाखल होण्यापूर्वी करोनाच्या सर्व नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

मॅंचेस्टरमधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम कसोटी रद्द झाल्याने आयपीएलमधील सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना अमिरातीत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.