IND vs AUS 3rd Test (Gabba) :- बॉर्डर -गावस्कर मालिकेच्या तिसऱ्या कसोटीला आजपासून ब्रिस्बेन येथील गाबा खेळपट्टीवर सुरुवात होणार आहे. या खेळपट्टीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या वर्गाची अंतिम परीक्षा होणार आहे. सध्याच्या घडीला मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने तिसऱ्या कसोटीतून या मालिकेचे भवितव्य आधारित असणार आहे. या मालिकेतील उर्वरित सामने जिंकून विश्व कसोटी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ट्रॅव्हिस हेड वगळता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मालिकेत विशेष कामगिरी करता आलेली नाही, ही भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे.
बॉर्डर गावस्कर मालिका रोमांचक वळणावर आली असून पर्थ कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला 295धावांनी मात दिली होती होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरादार पुनरागमन करताना ऍडलेड कसोटीमध्ये भारतावर 10 गडी राखून विजय मिळविला होता. या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या मदतीला मधल्या फळीतील फलंदाज ट्रॅव्हिस हेड धावून आला होता. त्याने दमदार 140 धावांची खेळी करताना भारताला बॅकफूटवर ढकलले होते. हेडचा अपवाद वगळता कांगारूंचा दिग्गज फलंदाजा स्टीव्हन स्मिथ देखील चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्यांला या मालिकेत आपली छाप टाकला आलेली नाही. भारताकडून काही चांगल्या खेळी केल्या गेल्या असल्यातरी रोहित आणि विराट यांचे धावा न करणे ही भारतासाठी डोकेदुखी झाली आहे. जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घाडीला दमदार कामगिरी करत असला तरी देखील त्याच्यावर गोलंदाजीचा पूर्ण भार आहे.
रोहित, विराटविषयी चर्चा
कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली गेल्या काही महिन्यानापासून सातत्याने धावांसाठी झगडताना दिसून येत आहे. या मैदानावर दोन्ही खेळाडूंची आकडेवारी म्हणावी तशी चांगली नाही व आकडेवारी नेहमीच खोटे बोलत नाही, हे या दोन्ही खेळाडूंनी मान्य केले आहे. त्यामुळे खेळपट्टीवर असणारा बाउंस आणि स्विंग या दोन गोष्टीसमोर रोहित आणि विराट अडचणीत येत आहेत. खेळपट्टीवर गवत जास्त असेल तर यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही, दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहे. केवळ फॉर्म सापडत नसल्याचे दोन्ही खेळाडू अडचणीत असल्याचे मान्य करावेच लागणार आहे.
रोहितला नेतृत्व करावेच लागेल
विराट व रोहित यांनी देशांतर्गत व परदेशात देखील गेल्या काही महिन्यानापासून धावांसाठी झगडत आहेत. बॉर्डर गावस्कर मालिकेत तर रोहितची सरासरी 6.88 तर विराटची सरासरी 10 एवढीच आहे. पर्थ येथील खेळपट्टीवर विराट कोहलीने शतकी खेळी करताना स्वतः वरील थोडेसे दडपण दूर केले होते. मात्र रोहित अजुनही सेट झाल्यासारखा वाटत नाही. सध्याच्या घडीला पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजसमोर रोहित अडचणीत येवू शकतो. त्यामुळे त्याला स्कॉट बोलंडवर लक्ष्य केंद्रित करावे लागणार आहे. मात्र, यासाठी त्याला फलंदाजीतील क्रम निश्चित करावा लागणार आहे. रोहित सलामीला खेळत असेल तर तो बचावापेक्षा आक्रमणावर जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे नक्की फलंदाजी कुठे करायची हे कर्णधाराच ठरवू शकतो.
IND vs AUS 3rd Test : गाबाची पुनरावृत्ती होणार नाही – मिचेल मार्श
जडेजाचे संघातील स्थान
रविचंद्रन अश्विन व वॉशिंग्टन सुंदर या दोघांनाही पहिल्या दोन कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मागील कामगिरीचा विचार करताना रवींद्र जडेजाचा विचार करता येऊ शकतो. त्याच्या समावेशाने भारताच्या फलंदाजीत सखोलता येऊ शकते, त्यामुळे अश्विन आणि सुंदर पेक्षा जडेजा हा सुरक्षित पर्याय आहे, असे म्हणता येऊ शकेल. आकाशदीपने न्यूझीलंड विरुद्ध गोलंदाजी करताना आपली कौशल्ये दाखविली होती. मात्र हर्षित राणाने पहिल्या दोन्ही कसोटीमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी डोकेदुखी
दोन सामने होऊनही हेड वगळता इतर फलंदाज फारसे यशस्वी ठरलेले नाहीत. मार्नस लॅबुशेनला देखील अर्धशतकी खेळी करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. स्टीव्हन स्मिथ अजूनही चाचपडत आहे. ॲडलेडमधील पहिल्या डावात नॅथन मॅकस्विनीने संयम दाखवला, जरी त्याला संघात स्थान मिळण्यास बराच वेळ लागणार आहे. मात्र, जसप्रीत बुमराहवर भारताची मदार असल्याने त्याची गोलंदाजी खेळून काढली तर इतर गोलंदाजांवर दबाव टाकता येऊ शकतो, हे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाना कळले असल्याने, त्यानुसार त्याची रणनीती आखली जाईल.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडे, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, हर्षित राणा
ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिच स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड.