भारत, आफ्रिका देशांचा सोमवारपासून संयुक्त सराव

पुणे – “भारत आणि आफ्रिकन देशांच्या सैन्यदलातील संयुक्त लष्करी सराव 18 मार्चपासून पुण्यात होणार आहे. “अफेन्डिक्‍स’ असे या सरावाचे नाव असणार असून आफ्रिकेतील सुमारे 16 राष्ट्रांचे सैन्य तुकडी या सरावात सहभागी होणार आहे. औंध येथील मिलिटरी स्टेशन आणि खडकी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) या दोन्ही ठिकाणी हा सराव होणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायटेड नेशन चार्टर अंतर्गत मित्रराष्ट्रांच्या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, श्रीलंका, व्हिएतनाम आणि बिम्सटेक राष्ट्रे या राष्ट्रांसोबतच भारतीय सैन्याचा लष्करी सराव झाला आहे. याच शृंखलेत एक पाऊल पुढे टाकत यंदा आफ्रिका खंडातील 16 राष्ट्रातील सैन्यांसोबत हा संयुक्त लष्करी सराव केला जाणार आहे. यामध्ये सेनेगल, नायझेरिया, इजिप्त, सुदान, उगांडा, घाना, झिम्बॉब्वे, केनिया, टांझानिया, मोझंबिके, नामिबिया, बोटसवाना, साऊथ आफ्रिका आणि झांबिया यांचा समावेश आहे. प्रत्येक देशाच्या सैन्यातील 10 अधिकारी-जवान यांची तुकडी या सरावात सामाविष्ट होणार आहे. या व्यतिरिक्त रवांडा, डेमोक्रटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, मडगास्कर या राष्ट्रांची सैन्य निरीक्षण तुकडीदेखील या सरावात सहभागी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.