लिंकन(न्यूझीलंड) : पृथ्वी शाॅ आणि संजू सॅमसनच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर भारत-अ संघाने पहिल्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड-अ संघावर ५ गडी राखून सहज विजय मिळवला आहे. यासह भारत-अ संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
India A take the early series lead in Lincoln against New Zealand A. Prithvi Shaw leading the India A chase with 48. VIDEO scorecard | https://t.co/EZcuKEnCvE #NZAvINDA pic.twitter.com/4ufpef0l3A
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 22, 2020
विजयासाठीचे २३१ धावांचे निर्धारित लक्ष्य भारत-अ संघाने २९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. भारत-अ संघाकडून पृथ्वी शाॅने ३५ चेंडूत ४८ तर संजू सॅमसनने २१ चेंडूत ३९ धावांची निर्णायक खेळी केली. तर शुभमन गिल ३०, सूर्यकुमार यादव ३५, मयंकने २९, विजय शंकरने नाबाद २० आणि कुणाल पांड्याने नाबाद १५ धावांची खेळी केली. न्यूझीलंड-अ संघाकडून नीशमने २५ धावांत २ गडी बाद केले.
India A beat New Zealand A by five wickets in first unofficial ODI. #BCCI
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2020
तत्पूर्वी, भारत-अ संघाचा कर्णधार शुभमन गील याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली होती. न्यूझीलंड-अ संघाने प्रथम फलंदाजी करताना रचिन रवींद्रच्या ४९, टाॅम ब्रूसच्या ४७ आणि ग्लेन फिलिप्सच्या २४ धावांच्या खेळीच्या जोरावर ४८.३ षटकांत सर्वबाद २३० धावा केल्या होत्या. भारत-अ संघाकडून महमंद सिराजने ३३ धावांत ३, खलील अहमदने ४६ धावांत २ आणि अक्षर पटेलने ३१ धावांत २ गडी बाद केले.