ख्राइस्टचर्च : सलामीवीर जाॅर्ज वर्करच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंड ‘अ’ संघाने एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुस-या सामन्यात शुक्रवारी भारत ‘अ’ संघाचा २९ धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंड ‘अ’ संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
न्यूझीलंड अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ७ बाद २९५ धावा केल्या होत्या. सलामीवीर जाॅर्ज वर्करने १४४ चेंडूत १२ चौकार व ६ षटकारांसह १३५ धावांची खेळी केली तर कोल मैकोंचीने ५६ धावांच योगदान दिलं.
प्रत्युत्तरात भारतीय अ संघाला ५० षटकात ९ बाद २६६ पर्यतच मजल मारता आली. कृणाल पांड्याने ४८ चेंडूत सर्वाधिक ५१ धावा केल्या. तर मयंक अगरवाल ३७, इशान किसन ४४, विजय शंकरने ४१ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून जेम्स नशीम, जेकब डफी आणि काइल जेमीसनने प्रत्येकी २ गडी बाद केले.