मुंबई –देश-विदेशात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडत असताना ससलेल्या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक दोन टक्क्यापेक्षा जास्त वाढले. बॅंकिंग, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रानी तेजीचे नेतृत्व केले.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,490 अंकांनी म्हणजे 2.55 टक्क्यांनी वाढून 59,744 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 458 अंकांनी म्हणजे 2.6 टक्क्यांनी वाढून 17,812 अंकांवर बंद झाला.
बॅंकिंग, तेल व नैसर्गिक वायू क्षेत्राचे निर्देशांक अनुक्रमे 6.3 टक्के व 5.3 टक्क्यांनी वाढले. मात्र आरोग्य क्षेत्राला व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला दोन टक्क्यांचा फटका बसला. सरलेल्या आठवड्यात मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन टक्क्यांनी वाढले.