मुंबई – रुपयाच्या मजबुती बरोबरच कंपन्यांचे चांगले ताळेबंद जाहीर होत आहेत. या कारणामुळे शेअरबाजार निर्देशांकांने सलग चौथ्या दिवशी आगेकूच केली.
मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 224 अंकांनी वाढून 38,407 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंकांनी वाढून 11,322 अंकांवर बंद झाला. भारतीय अर्थव्यवस्था लवकर पुनरुज्जीवित होण्याच्या शक्यतेमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा ओघ चालू असल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांना चांगला आधार मिळत आहे.