कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. एकीकडे राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे स्पष्ट असले तरी, दुसरीकडे भाजपा व शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आपले संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, इचलकरंजी विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. आवाडे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांसमवेत एकत्रितपणे अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा मनोदय सर्वांनी बोलून दाखविला.
या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेत ३ आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर (नालासोपारा), शेकापचे श्यामसुंदर शिंदे (लोहा), जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे (शाहूवाडी), अपक्ष आमदार सर्वश्री रवी राणा (बडनेरा), संजय मामा शिंदे (करमाळा)