चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोरगेवार यांचा भाजपला पाठिंबा

मुंबई – सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. दरम्यान, आज मुंबईत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पक्षीय बलाबलमध्ये सध्या भाजपचेच पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांपासून भाजपचे राज्यातील नेते जोरगेवार यांच्या संपर्कात होते, तर चिमूरचे भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन चंद्रपूरला जोरगेवार यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी जोरगेवार यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा त्यांना निरोप दिला. त्यानंतर आज जोरगेवार यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना युती करणे भाग आहे. त्यात शिवसेना सत्तेमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर भाजपने मात्र आमचं ठरलंय याला स्पष्ट नकार दिला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here