अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांना करोनाची लागण

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटेनेते कैलास बारणे यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यामध्ये लक्षणे जाणवत होती. त्रास होत असल्याने ते महापालिकेमध्ये येत नव्हते. त्यांची करोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

बारणे यांची तब्येत बरी नसल्याने गुरुवारी ते महापालिकेमध्ये आले नाही. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवेळी बारणे गैरहजर असल्याने सभागृहामध्ये बराच गोंधळ झाला होता. तसेच राजकीय दबावामुळे बारणे गैरहजर असल्याची चर्चा होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.