अकोल -तालुक्यातील 45 पैकी 41 ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाल आज जाहीर झाला असून सर्वाधिक चुरशीच्या झालेल्या राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार किरण लहामटे गटाने सरशी झाली असून माजीमंत्री मधुकर पिचड यांच्या गटाला पराभव परत्कारावा लागला. भाजपने 25 ग्रामपंचायतींची सत्ता मिळविल्याचा दावा केला तर राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी 35 ग्रामपंचायतीचा दावा केला. दोन्ही पक्षांनी दावे प्रतिदावे केले असले तरी अनेक ग्रामपंचायतमध्ये तरुण सरपंच निवडून आले असून बहुतांशी अपक्षांचा झेंडा लागला आहे.
अनेक ग्रामपंचायतमध्ये तरुण सरपंच निवडून आले तर मोठ्या प्रमाणात महिला सरपंचपदी विराजमान झाल्याने महिलाराज आले. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत प्रतिष्ठेची व अटितटीची लढाई पहायला मिळाली. सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून लोकांचा जल्लोष सुरु होता. आमदार डॉ. किरण लहामटे हे आपल्या राष्ट्रवादी कार्यालयात तर माजी आमदार वैभवराव पिचड हे भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचे नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देत होते. आज सकाळी तहसिल कार्यालयात तहसीलदार सतिष थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दत्ता जाधव, महाले, दातखिळे तात्या, कैलास खाडे, गंभीरे यांनी अतिशय पद्धतशीरपणे मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
गावनिहाय निवडून आलेले सरपंच व सदस्य पुढीलप्रमाणेः 1) म्हाळुंगी- सरपंचः मदन निवृत्ती मेंगाळ., सदस्य- रामचंद्र डामसे, आशा सुभाष नाडेकर, मंजुळाबाई मधुकर सदगीर, उमाजी उघडे, रावसाहेब सदगीर, आशा योगेश सोंगाळ (सर्व सदस्य बिनविरोध). 2) सांगवी – सरपंचः मनिषा शांताराम मेंगाळ (अपक्ष)., सदस्य- नामदेव तळपाडे, भाऊसाहेब तळपाडे, सुनिता एकनाथ तळपाडे, मदन डगळे, शितल पंढरीनाथ तळपाडे, सिताबाई भारत खोकले,अर्जुन तळपाडे, (बिनविरोध), रोहीणी भागवत तळपाडे (बिनविरोध) 1 जागा रिक्त. 3) धामणवन- सरपंचः मनिषा पोपट चौधरी., सदस्य- सुनिल धिंदळे (बिनविरोध), प्रमिला शांताराम रेंगडे (बिनविरोध), रत्ना शिवराम चौधरी (बिनविरोध), रंगनाथ बारामते, ढवळाबाई दशरथ बारामते (बिनविरोध), मारूती धराडे, सिता जयराम धिंदळे (बिनविरोध).
4) मवेशी- सरपंचः यमाजी भिवा भांगरे, सदस्य- कोंडार रवींद्र बाळु, कोंडार सविता राजु, कवटे महादु बहिरु, बांबळे आशा गोरक्षनाथ, बांबळे गंगुबाई काळु, जाधव लक्ष्मण भागवत, भांगरे वंदना नटराज, भांगरे गंगुबाई यादव.5) केळी रुम्हणवाडी- सरपंचः मुरलीधर चिमा मेंगाळ- 783 (अपक्ष). सदस्य- तळपाडे विजय बबन, मेंगाळ शीला शांताराम, भोईर निर्मला बाळु, जगताप भाऊसाहेब चंदू, बिन्नर ज्ञानेश्वर संतु, सदगीर लीलाबाई नामदेव, मेंगाळ मावजी हरी, मेंगाळ ममता भास्कर, मेंगाळ हिराबाई अशोक. 6) पाडोशी- सरपंच ः दत्तु विष्णु कुलाळ 349 ( अपक्ष). सदस्य- साबळे किसन धोंडु, साबळे रेणुका ढवळा, साबळे लक्ष्मी चंद्रकांत, नाडेकर बहिरु पाडूंरंग, साबळे वेणुबाई नामदेव, साबळे अरुण दिलीप, साबळे वनिता प्रकाश.
7) तळे- सरपंचः हौशिराम धोंडिबा वेडे., सदस्य- नाडेकर बबन गुणाजी, नाडेकर शंकर काळु, घोडे सखाराम गोंविदा, कोरडे लक्ष्मण नामजी, नाडेकर भोराबाई वामन (बिनविरोध), भालेराव मनिषा गणपत (बिनविरोध), मुठे ताईबाई बूधा (बिनविरोध), वरे सविता लक्ष्मण (बिनविरोध) व एक जागा रिक्त. 8) तेरुंगण- सरपंचः मच्छिंद्र देवराम कोकतरे (अपक्ष). सदस्य- कातडे गंगाराम लक्ष्मण (बिनविरोध) व 6 जागा रिक्त. 9) खिरविरे- सरपंचः गणपत नामदेव डगळे., सदस्य- डगळे दगडु निवृत्ती, डगळे अनुसया हिरामन, (बिनविरोध), कदम मिराबाई नामदेव (बिनविरोध), डगळे भाऊराव महादु, बेनके सुभाष विठ्ठल, डगळे पार्वताबाई भिमाजी (बिनविरोध), शेगाळ राजु विठ्ठल, दिंडे रंजना नितीन, डगळे नामदेव दुंदा, पराड गौतमी अजित, धोंगडे रूपाली रामदास. 10) मुथाळणे- सरपंचः सुनंदा अविनाश गांवडे., सदस्य- कातोरे संजय तुकाराम, कातोरे कविता सुरेश, सदगीर अलका संतोष, सदगीर चक्रधर भिमाजी, बांगारे सविता चंद्रभान, सदगीर सुनिता बाळु, फोडसे अरुण तान्हाजी, होलगीर किसन तुकाराम, मधे संगिता लक्ष्मण.
11) कातळापुर- सरपंचः बाळु महादु ढगे., सदस्य- शिंदे लक्ष्मण विश्वनाथ, ढगे सुमन गंगाधर, खाडगीर लक्ष्मी गोरक्षनाथ, खाडे सक्रु बारकु, तातळे आशा भास्कर, ढगे धोंडीराम बाळु, काठे योगिता दत्तु. 12) माळेगाव- सरपंचः चंद्रकांत तान्हाजी सुकटे (अपक्ष)., सदस्य- सुकटे अनिल मारुती व 6;जागा रिक्त. 13) कोदणी- सरपंच चित्रा सुनिल बाबेरे ., सदस्य- बांबेरे सागर भिमा, बांबेरे शिवानी बबन, कोकाटे सुशीला कुंडलिक, पवार गोरक्षनाथ यादव (बिनविरोध), बांबेरे संगिता वसंत (बिनविरोध), बांबेरे लक्ष्मण मनोहर, करवंदे सुमन दिनेश( बिनविरोध). 14) रणद बु- सरपंचः सुंदरलाल हरी भोईर., सदस्य – पोटकुले रामचंद्र बुधा (बिनविरोध), भोईर रोहिणी भास्कर (बिनविरोध), कोरडे मच्छिंद्र काळु (बिनविरोध), मराडे चंद्रभागा भरत, पटेकर लक्ष्मण नानाजी (बिनविरोध).दोन जागा रिक्त.
15) करंडी- सरपंचः ज्योती सुनिल गोंदके (अपक्ष)., सदस्य- गोंदके अशोक रामचंद्र, लहांगे कल्पना शिवाजी, गायकर संगिता बाळासाहेब, गोंदके विठ्ठल नाथ, गोंदके ज्योती सुनिल, गोंदके चंद्रकांत सीताराम, गोंदके संगिता बाळासाहेब. 16) शिरपुंजे बु- सरपंचः कांताबाई भाऊ धिंदळे, सदस्य- साबळे गणपत धोंडु, धिंदळे उषा गोरक्षनाथ, धिंदळे कांताबाई भाऊ, धिंदळे साईनाथ विठ्ठल, धिंदळे तुळसाबाई लालु, धिंदळे अश्विनी विठ्ठल, धिंदळे गुलाब बहिरु, धिंदळे यशवंत कोंडाजी, धिंदळे स्वाती शिवराम. 17) कोहंडी- सरपंचः हिराबाई पांडुरंग तातळे, सदस्य- वाघ मथुरा बस्तिराम (बिनविरोध), परते विनायक साळु (बिनविरोध), किरवे गिताबाई राजु (बिनविरोध), तातळे जगन श्रावणा (बिनविरोध), गवारी सविता शिवाजी (बिनविरोध). 18) लव्हाळी ओतुर- सरपंचः प्रकाश यमाजी लहामटे., सदस्य- धोंडबरे दशरथ इदु, भांडकोळी कुंडलिक धोंडिबा, लहामटे रंजना नंदकुमार, पोटकुले रोहिदास विठ्ठल, नाडेकर राहुल बारकु, लहामटे जयश्री जालिंदर. 3 जागा रिक्त. 19) केळुंगण- सरपंचः युवराज मुलीधर देशमुख., सदस्य- देशमुख एकनाथ रेवन्नाथ, देशमुख लता पांडुरंग (बिनविरोध), धिंदळे नवनाथ लक्ष्मण, देशमुख हौसाबाई गोरक्षनाथ (बिनविरोध), देशमुख भास्कर लक्ष्मण, देशमुख वनिता भास्कर (बिनविरोध). 1 जागा रिक्त.
20)चिंचावणे- सरपंचः अलका खेमा डगळे., सदस्य- डगळे मनिषा गणेश, साबळे यशवंत रामभाऊ, चावडे सविता गजानन, डगळे अलका खेमा, मुठे संदीप गणपत, डगळे मंदा युवराज, घिगे प्रकाश चिंधु. 21) पाडाळणे- सरपंचः रोहणी सुनिल बगाड., सदस्य- उगले शिवाजी कृष्णा, बगाड मनिषा रामनाथ, सावंत रूपाली संदीप, अरबले बुधा धोंडिबा, तळेकर शिला संजय, सुपे शोभा रामहारी, तळेकर विकास रामदास, मधे अनिता रखमा, मधे भाऊसाहेब कारभारी. 22) मान्हेरे- सरपंचः सुनिता अजय गभाले (अपक्ष)., सदस्य- गभाले गोरख मारूती, कांबळे सुकेशनी सुरेश, गभाले दशरथ भाऊ, गभाले लहु मारूती, गभाले रूपाली बाळु, घोरपडे देविदास चंदर, घोरपडे जयश्री दिपक, धिंदळे प्रभावती अंकुश, झांबाडे सरोजनी प्रकाश (बिनविरोध). 23) वारंघुशी- सरपंचः फसाबाई निवृत्ती बांडे (अपक्ष)., सदस्य- लावरे भगवान विष्णु, घाणे कमल राजेंद्र, कडाळी विलास भरत, भागडे दिपक चंदर, कडाळी शारदा संदीप, कोरडे प्रकाश अर्जुन (बिनविरोध), घाणे मथुराबाई दशरथ (बिनविरोध), मुठे समीर तुकाराम, कडाळी कविता मोहन (बिनविरोध), घाणे मयूरी नंदु.
24) आबितखिंड- सरपंचः घनकुटे यमुना दत्तात्रय., सदस्य- भारमल ओंकार काशिनाथ, भोजणे कल्पना अजय, गंभीरे भाऊराव देवराम, गोडे सिमा दिनेश, भोजणे रामनाथ किसन, भोजणे नंदा शरद. 25) पळसुंदे – सरपंचः सुरेश महादु वळे., सदस्य – घोडे संजय कोंडिबा (बिनविरोध), भगत दगडु कुशाबा (बिनविरोध), मुठे मोहनाबाई गोविंद (बिनविरोध), कचरे ज्ञानदेव मनोहर(बिनविरोध), कचरे जिजाबा लुमा, दुटे सखूबाई रामदास, उंबरे पार्वता गुरुदत्त. 26) विठे- सरपंचः कलाबाई हिरामण मेंगाळ., सदस्य- इदे विनोद बाळु, म्हशाळ सारीका उल्हास, मोहटे छाया सुधीर, पथवे रामनाथ उमाजी, आवारी अनिकेत दत्तात्रय, मेंगाळ मिराबाई गिरजा, उघडे अनिता अशोक, पथवे राजाराम राघु, वाकचौरे कमल नवनाथ. 27) सातेवाडी- सरपंचः केशव गोविंद बुळे., सदस्य- दाभाडे भरत एकनाथ (बिनविरोध), रोहणी पांडुरंग गभाले (बिनविरोध), आशा अरुण धराडे (बिनविरोध), काशिनाथ रखमा मुठे, संगिता सुरेश दिघे, बुधाबाई लक्ष्मण मुठे, लक्ष्मण विठ्ठल मुठे, वंदना किसन मुठे (बिनविरोध). 28) पांजरे- सरपंचः उघडे रामचंद्र म्हाताजी., सदस्य- उघडे ज्ञानदेव पांडुरंग, उघडे मिना पांडुरंग (बिनविरोध), गांगड मथुरा तुळशीराम (बिनविरोध), मधे उल्हाजी पिलाजी, उघडे मिनानाथ मदु, उघडे मिना यशवंत, उघडे मोहन शांताराम, उघडे अनिता शिवराम (बिनविरोध), उघडे दुर्गा लक्ष्मण (बिनविरोध). 29)
उडदावणे- सरपंच किर्ती देविदास गिऱ्हे (अपक्ष)., सदस्य – गिऱ्हे भिमराज देवराम (बिनविरोध, लोटे रखमाबाई सोमनाथ, (बिनविरोध), सोनवणे सुरेखा अर्जुन (बिनविरोध), गिऱ्हे संजय भाऊ, लोटे रंगनाथ रामजी, गिऱ्हे राणी काशिनाथ, गिऱ्हे भास्कर सुरेश, गिऱ्हे मिराबाई मोहन, गांगड मंगलाबाई शांताराम. शेणित बु – सरपंच गोविद कोडाजी करवंदे (अपक्ष) सदस्य ः सर्व बिनविरोध. पिंपरकणे- सरपंच अनुसया अरुण थिगळे. सदस्य ः थिगळे निवृत्ती ठका, आढळ सुनिता तुकाराम, थिगळे अनुसया अरुण, पिचड ज्ञानेश्वर निवृत्ती, पिचड कैलास निवृत्ती, पिचड कुंडलिक घेवजी, पिचड उषा प्रसाद व दोन जागा रिक्त. सावरगाव पाट – सरपंच रामनाथ वाळिबा गावंडे. सदस्य- जगताप बाळकृष्ण गौतम, पथवे सुनिता नानासाहेब, नेहे निशा रावसाहेब, गावंडे राजाराम भाऊराव, सहाणे बाळासाहेब यशवंत, गावंडे लक्ष्मी तुळशीराम, पथवे पांडुरंग शिवा, पथवे अनिता गेणू, पवार अलका सखाहारी.टाहाकारी – सरपंच चांगुणा भाऊसाहेब मेंगाळ. सदस्य – मेंगाळ मच्छिंद्र सखाराम, एखंडे बाळासाहेब नरहरी, अस्वले अनिता भास्कर, एखंडे शिवाजी चंद्रभान, मेंगाळ चांगुणा भाऊसाहेब, एखंडे कमल दगडु, मेंगाळ उमा राधु, अस्वले अनिता भास्कर, सुमन एकनाथ एखंडे. चिचोंडी – सरपंच कविता सुनिल मधे. सदस्यः सचिन तुकाराम मधे, हिराबाई राजेद्र मधे, अंकुश तुकाराम मधे, श्रद्धा विनोद सोनवणे,
सोमा नावजी मधे,आनंदा रामजी सगभोर,सविता शरद गभाले (बिनविरोध), दोन जागा रिक्त. बाभुळवंडी – सरपंच मंदा पंढरीनाथ लेंडे. सदस्य- वाळीबा किसन भोईर, संगिता भागवत मशाळ, सोमनाथ हरि भवारी, इंदुबाई मधुकर लेंडे, पांडुरंग चिंधी लेंडे (बिनविरोध) मंदा पंढरीनाथ लेंडे, सर्वसाधारण स्त्री जागा रिक्त. टिटवी – सरपंच तुकाराम गोविद वायाळ (अपक्ष). सदस्य भांगरे रंगनाथ भावका, भांगरे कविता रविराज, मुंढे अनुसया सोमनाथ, मेमाणे देवराम लहानु, बोबडे प्रवीण विलास, मुंढे वैशाली रोहिदास (सर्व सदस्य बिनविरोध), एक जागा रिक्त. गोदुंशी – सरपंच रत्नाबाई भाऊ हिले. सदस्य-थिगळे योगेश मारुती, शिंदे अलका विवेक, थिगळे अनिता लक्ष्मण, बोटे संतोष दिनकर, पेढेकर चारुशिला नागेश, बोटे सत्यभामा देवराम, हिले दौलत शिवराम, हिले सुरेखा काळू(एक जागा रिक्त). केळी-कोतुळ – सरपंच भवारी चंद्रकांत नामदेव व संजय लक्ष्मण धराडे, यांना सारखी मते मिळाल्याने चिठ्ठी काढून चंद्रकांत नामदेव भवारी हे विजयी झाले. सदस्य – तळपे शंकर गोपिनाथ, भवारी दारकु मेसु, गोडे रामनाथ येदु, गोडे मनोहर हरिबा, वाळेकर सुनंदा सखाराम. केळी- ओतूर ः सरपंच मिना दत्तात्रय वायाळ. सदस्य- वायाळ भाऊ लक्ष्मण, वायाळ रंजना पांडुरंग, वायाळ पार्वता देवजी, वायाळ दत्ताञय गोविंद, वायाळ संगिता बाळु, बो-हाडे राणी तुषार, कांबळे सुरेश विठ्ठल,
बांगर अजय चंद्रकांत, कांबळे स्वाती जालिंदर (बिनविरोध). समशेरपूर – सरपंच एकनाथ हरी मेंगाळ. सदस्य- उघडे मरुती बारकु, मेंगाळ इंदिरा उमाजी, बेनके जिजाबाई निवृत्ती, मेंगाळ निवृत्ती हरी, मेंगाळ शालिनी गंगाराम, दराडे कचरु जबाजी, चौधरी दत्तात्रय सोनु, साळवे जनाबाई माधव,फोडसे अनिता राजु,फोडसे सुभाष रामभाऊ (बिनविरोध), भरीतकर माया योगेश, माळी दत्तु तुकाराम, बेनके नितिन किसन, बेनके संगिता शंकर व एक जागा रिक्त . राजूर – सरपंच पुष्पा दत्तात्रय निगळे. सदस्य पवार अतुल सुरेश, देशमुख प्रमोद बाळासाहेब, मैड संगिता राजेंद्र, नवाळी ओंकार बाळासाहेब, मोहंडुळे संगिता धनंजय, जाधव संगिता लक्ष्मण, मुर्तडक हर्षल नंदकुमार, देशमुख रोहीणी दत्ता, कानकाटे गोकुळ हरिभाऊ, डगळे सुप्रिया धोंडीबा, वालझाडे सारीका शेखर, बांगर राम विठ्ठल, भांगरे विमल विजय, माळवे रोहिणी नंदकुमार, देशमुख गणपत एकनाथ, बनसोडे संतोष लक्ष्मण, सोनवणे लता चंद्रकांत.
ईश्वर चिठ्ठीने सरपंचपदाची लॉटरी
<ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत केळी-कोतुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीतील उमेदवार चंद्रकांत नामदेव भवारी (293 मते) व संजय लक्ष्मण धराडे (293 मते) यांना सारखीच मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. यावेळी लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आलेल्या चिठ्ठीद्वारे चंद्रकांत नामदेव भवारी हे सरपंच पदी विजयी झाले.