‘ही’ माजी महिला क्रिकेटपटू लढवणार अपक्ष निवडणूक

नगर: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. उमेदवारांची अर्ज भरण्याची धावपळ सुरु आहे. दरम्यान, नगरमध्ये यावेळेस अटीतटीचा सामना रंगणार आहे. कारण सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्या लढाईमध्ये आणखी एक अपक्ष उमदेवार सामना करण्यास सज्ज आहे.

महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील माजी खेळाडू, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती ऍड. कमल सावंत आता लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत.नगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

सावंत या उत्कृष्ट क्रिकेटपटू होत्या. महाराष्ट्र महिला संघाकडून त्या 1975 ते 1986 या कालावधीत खेळत होत्या.पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्त्वही त्यांनी केले होते. जिल्हा परिषदेत निवडून गेल्यानंतर सावंत यांनी युवक कॉंग्रेसच्या सहसचिव व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.