करमाळा – आज भारताचा ७३ वा स्वातंत्रदिन साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच करमाळा शहरात एका अनोख्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून घोरपडे संजय तसेच स्वातंत्र्य सैनिक नरसिंह चिवटे उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यावतीने या यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत सुमारे 200 ते 300 विद्यार्थी व समाजसेवकांनी भाग घेतला असून, करमाळा शहरातील मुख्य रस्त्यांवरून ही यात्रा निघाली. यासाठी करमाळा अभाविपचे संतोष कांबळे, जिल्हा संयोजक प्रणव बाडगंडी, विकास खंडागळे, शुभम बंडगर, आनंद भुसनर, योगेश्वर राजपुरोहित, तसेच अनेक नागरिक देखील या यात्रेत सहभागी झाले होते.