गॅस बुकिंगचा क्रमांक बदलला; 1 नोव्हेंबरपासून ‘इंडेन’ गॅससाठी असणार ‘हा’ नवीन क्रमांक

पुणे – इंडियन ऑईल कंपनीच्या इंडेन गॅस सिलिंडर बुकिंगसाठी असलेला क्रमांक शनिवारी मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. ग्राहकांनी गॅस बुकिंगसाठी एक नोव्हेंबरपासून 7718955555 या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन इंडियन ऑइल कंपनीकडून करण्यात आले आहे.

भारत पेट्रोलीयम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस सिलिंडर बुकिंगचा क्रमांक पूर्वीचाच असणार आहे.

ग्राहकांना आता गॅस सिलिंडर बुकिंगसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून गॅस बुक करता येतो. ग्राहकांचा मोबाईल क्रमांक नोंदवलेला असेल तर ग्राहकांना त्यांचा 16 आकडी क्रमांक सूचित केला जाईल.

मोबाईल क्रमांक नोंदविला नसल्यास सोळा आकडी ग्राहक क्रमांकाआधी 7 आकडा नोंदवून मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. गॅस सिलिंडरच्या पावतीवर किंवा गॅस नोंदणी पुस्तकावर तो सोळा आकडी ग्राहक क्रमांक मिळेल, अशी माहिती इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.