इंदापूरच्या ग्रामीण भागात चिंता वाढली ..
रेडा (प्रतिनिधी) – तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या इंदापूर शहरात करोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसातच अचानक वाढल्यामुळे नागरिकांना मोठी चिंता होती. त्यामुळे लोकांना नको शहर ग्रामीण भागत बरा असे वाटत असतानाच ग्रामीण भागातील घोरपडवाडी गावात एका महिलेस करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी (दि. 20) निष्पन्न झाले आहे.
घोरपडवाडी गावचा परिसर म्हटलं की, कोणतेही वर्दळीचे ठिकाणचा रस्ता गावात नाही. बाहेरच्या लोकांची वर्दळ नाही. अशा गावात हा रुग्ण सापडला आहे. परंतु याचे मुख्य कारण असे की, ज्या महिलेस करोनाची बाधा झाली आहे, तिचे पती नोकरीनिमित्त सातत्याने पुण्याला ये-जा करत असतात. मागील काही दिवसात या महिलेला पुण्याला उपचारासाठी नेण्यात आले होते. याच ठिकाणी तपासणी केल्यानंतर करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या महिलेवर पुणे येथे उपचार सुरू आहेत.