रेडा – इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांच्या पुढे करण्यासाठी संचालक मंडळाने मेहनत घेतली आहे. असे गौरवोद्गार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची विशेष सभा चेअरमन किरण मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसभापतीपदी वसंत फलफले तसेच सचिवपदी संजय लोहार यांची बिनविरोध निवड पार पडली. माजी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील निवासस्थानी नवनिर्वाचित उपसभापती फलफले व सचिव लोहार तसेच संचालक मंडळाचा सन्मान केला.
पाटील म्हणाले की, तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना आर्थिक मोलाचा आधार मिळत आहे. संस्थेची काटकसर महत्त्वाचे असून या संस्थेचे वार्षिक उलाढाल 100 कोटी रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकिक मिळविला आहे. संस्थेचा कारभार पारदर्शी असल्याने गुणात्मक दर्जा प्राप्त केला आहे. यावेळी पतसंस्थेचे संचालक सुनील मखरे, विलास शिंदे, ज्ञानदेव चव्हाण, ज्ञानदेव बागल, हरीश काळेल, संभाजी काळे, नितीन वाघमोडे, सुरेश भोंग, नानासाहेब दराडे, हनुमंत दराडे, सुभाष भिटे, आदिनाथ धायगुडे, दत्तात्रय ठोंबरे, सुनील वाघ, नानासाहेब नरुटे, बालाजी कलवले, रुपाली कदम, सुनंदा बोके, मनीषा मोटे, तज्ज्ञ संचालक विठ्ठल सूर्यवंशी, प्रमोद कुमार कुदळे, लिपिक संजय तरंगे उपस्थित होते.