इंदापूर | नेचर डिलाईट डेअरीच्या पावडर प्रकल्पाला भीषण आग

लासूर्णे(प्रतिनिधी) – कळस (ता. इंदापुर) येथील नेचर डिलाईट डेअरीच्या पावडर प्रकल्पाला अचानक आग लागण्याची घटना आज (दि.२३) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीमध्ये ड्रायर व इतर यंत्रसामग्री जाळली आहे व त्यासोबत दूध पावडरचे मोठ्या साठ्याचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये जवळपास 10 कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगीची माहिती समजताच बारामती नगरपरिषदच्या व छत्रपती कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले व ती आग आटोक्यात आणली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.