-->

इंदापूर : उत्कृष्ट ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करणाऱ्या डॉ. राजेंद्र साळुंखे यांचा सन्मान 

रेडा – इंदापूर शहरातील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र साळुंखे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा मार्फत ॲानलाईन टिचींगबाबत १२५ महाविद्यालयामध्ये, विद्यापीठाच्या “लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम” या योजनेमधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट व प्रभावी ॲानलाईन मटेरिअल तयार केल्याने त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते बेस्ट फॅकल्टी म्हणून सन्मानित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लॉकडाऊनच्या काळात सर्व महाविद्यालयात शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून सर्व शाखांचे सर्व अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या सर्व साहित्याचे ॲाडिओ व व्हिडीओ क्लिपस तयार करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेला प्रतिसाद देत इंदापूरचे डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी अतिशय उत्कृष्ट अभ्यासक्रम ऑनलाइनसाठी तयार केले.त्याची निवड विद्यापीठामार्फत अभ्यास निवड समितीने केली.

त्यामध्ये डॉ. साळुंखे यांना अव्वल क्रमांक मिळाला असून, त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे व्हाईस-चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. कोटेचा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मिळालेल्या पुरस्काराबद्दल इंदापूर शहरातील सोनाईनगर गणेश मित्र मंडळाच्या वतीने, व समस्त इंदापूर शहरवासीयांच्या वतीने सामजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक सौरभ शिंदे,दीपक झालटे – पाटील, प्रतीक शिंदे,रामचंद्र शिंदे, महाजन सर, काळे सर, दिपक पाटील बाळासाहेब शिंदे दीपक झालटे पाटील व सोनाईनगरच्या नागरिक आदींनी डॉ. राजेंद्र साळुंखे यांचा सन्मान केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.