इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व शहा परिवार पुन्हा एकत्र

अप्पासाहेब जगदाळे यांनी केली शिष्टाई

इंदापूर (नीलकंठ मोहिते / प्रतिनिधी) – मागील काही महिन्यापासून भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच इंदापूर शहरातील शहा परिवार यांच्यामध्ये राजकीय अंतर पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून शहा परिवाराचे या कारखान्यांमध्ये मोठे योगदान आहे.

कारखान्याचे माजी संचालक भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी इच्छा हर्षवर्धन पाटील समर्थकांची होती. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शहा परिवाराचे पाहिजेत त्या प्रमाणात मनोमीलन झाले नव्हते. परंतु इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी थेट शहा यांच्या इंदापूर शहरातील निवासस्थानी जाऊन योग्य शिष्टाई केली. त्यामुळेच भरत शहा यांनी कारखान्याच्या ऊस उत्पादक गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन भरत शहा, तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळशेठ शहा यांचे व कै. शंकराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध अनेक वर्षापासून तालुक्याला परिचित आहेत.

मात्र शिक्षण संस्थेच्या कारणावरून राजकीय दुरावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे संदर्भात झालेला होता.भरत शहा यांनी आपल्याकडील असणाऱ्या सर्व संस्थेतील पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे बदलतील असा होरा होता.त्यामुळे कारखान्याच्या निवडणूक रिंगणात शहा परिवार आपला प्रतिनिधी पाठवणार की, नाही.याबद्दल मोठी चर्चा तालुक्यांमध्ये रंगली होती.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शहा परिवाराचा रुसवा काढतील अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील समर्थकांना पहिल्यापासून होती. याच गोष्टीला अनुसरून इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी कारखान्याच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहा परिवाराच्या निवासस्थानी जाऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण उमेदवारी दाखल करावी अशी विनंती केली.

माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे हे दिलेल्या शब्दाला पक्के आहेत. हे इंदापूर तालुक्यातील गावा – गावातील कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे शहा परिवाराने अखेर आपले रुसवे-फुगवे बाजूला सारत, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शहा परिवार व हर्षवर्धन पाटील यांच्यामधील दूरावा संपुष्टात आला आहे.

माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचा सन्मान शहा परिवाराच्या निवासस्थानी शुक्रवार (ता.24 रोजी) इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा भरत शहा अंगत शहा यांनी केला.

“शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम काम करत राहणार “

कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी असंख्य अडचणीतून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. यामध्ये कारखान्याच्या स्थापनेपासून आमचे काका गोकुळशेठ शहा,आज पर्यंत सोबत राहिले.राजकारण हा विषय वेगळा आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी साखर कारखानदारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी सभासदांचा उमेदवारी भरण्यासाठी चा आग्रह मी ढालावू शकलो नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम काम करत राहणार असल्याची ग्वाही भरत शहा यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.