T20 Asia Cup 2024 (IND-W vs BAN-W) Semi-Final 1 : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शुक्रवारी उपांत्य फेरीत बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. स्मृती मंधानाने नाबाद अर्शतक झळकावत तर रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 3 बळी घेत महत्वपूर्ण योगदान दिले.
बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने अवघ्या 11 षटकांत विजयी लक्ष्य गाठले. भारतासाठी मंधाना आणि शफाली वर्मा सलामीला आल्या. मंधानाने 39 चेंडूंचा सामना करत नाबाद 55 धावा केल्या. तिने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर शेफालीने 28 चेंडूंचा सामना करत 26 धावा केल्या. तिने या खेळीत 2 चौकार मारले.
4⃣ overs
1⃣ maiden
1⃣0⃣ runs
3⃣ wicketsFor her fantastic incisive spell, Renuka Singh is named the Player of the Match 👏
Scorecard ▶️ https://t.co/JwoMEaSoyn#TeamIndia | #INDvBAN | #WomensAsiaCup2024 | #ACC | #SemiFinal pic.twitter.com/FOBWCwTY87
— BCCI Women (@BCCIWomen) July 26, 2024
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 80 धावाच करू शकला. बांगलादेशकडून फलंदाजीत कर्णधार निग्रा सुलतानने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली तर शोर्ना अख्तरने नाबाद 19 धावा केल्या. याशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
यादरम्यान गोलंदाजीत रेणुका आणि राधा यांनी टीम इंडियासाठी घातक गोलंदाजी केली. दोघींनी 3-3 विकेट घेतल्या. दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. राधाने 20 व्या षटकात दोन विकेट घेतल्या त्याचबरोबर हे षटक देखील निर्धाव टाकले.
भारत आठव्या विजेतेपदाच्या मोहिमेवर….
भारतीय संघ सलग नवव्यांदा महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत धडक मारत भारतीय महिला क्रिकेट संघ आता आठव्यांदा आशिया चषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताने वनडे फॉरमॅटमध्ये चार आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तीन जेतेपदे पटकावली आहेत. महिला आशिया चषक 2004 मध्ये सुरू झाला आणि टीम इंडिया त्यावेळी चॅम्पियन बनली. 2008 पर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जात होती. त्याच वेळी, 2012 पासून ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळली जात आहे. ही नववी आवृत्ती आहे आणि भारताने सात वेळा (2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016, 2022) विजेतेपद पटकावले आहे. भारताव्यतिरिक्त बांगलादेश हा महिला आशिया कप जिंकणारा एकमेव संघ आहे.