IND vs ZIM 5th T20 (Toss Update) : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत भारताने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
पाचव्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकला आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Zimbabwe won the toss and Elected to Bowl) त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
🚨 Toss Update 🚨
Zimbabwe elect to field in the 5th and final T20I.
Follow The Match ▶️ https://t.co/TZH0TNJcBQ#TeamIndia | #ZIMvIND pic.twitter.com/zKc5XsarxI
— BCCI (@BCCI) July 14, 2024
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने दमदार फलंदाजी करत 10 गडी राखून विजय मिळवला होता. यासह टी-20 क्रिकेटमध्ये एखाद्या संघावर 10 विकेट्सने विजय मिळण्याचा पराक्रम टीम इंडियाने दुसऱ्यांदा केला होता.