IND vs ZIM 1st T20 Match Result : आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना दुपारी साडेचार वाजल्यापासून हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा 13 धावांनी पराभव केला आहे.
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 115 धावा करत भारतासमोर 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला 19.5 षटकांत सर्वबाद केवळ 102 धावाच करता आल्या. या विजयासह झिम्बाब्वेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
The match went down till the very last over but it’s Zimbabwe who win the 1st T20I.#TeamIndia will aim to bounce back in the 2nd T20I tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/r08h7yfNHO#ZIMvIND pic.twitter.com/FLlBZjYxCb
— BCCI (@BCCI) July 6, 2024
गिल आणि सुंदर यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या सामन्यात टीम इंडियासाठी पदार्पण करणारे तिन्ही फलंदाज फ्लॉप ठरले. झिम्बाब्वेविरुद्ध अभिषेक शर्मा खातेही न उघडता बाद झाला. त्याचवेळी रियान पराग आणि ध्रुव जुरेलही काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. या तीन खेळाडूंनी आयपीएल 2024 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. पदार्पणाच्या सामन्यात मात्र तिघेही सपशेल फ्लॉप ठरले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात संघाने अभिषेक शर्माची विकेट गमावली. अभिषेक चार चेंडूत खाते न उघडता बाद झाला. यानंतर विकेट्सची पडझड सुरूच राहिली. शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशिवाय कोणीही चांगली फलंदाजी केली नाही. कर्णधार गिलने पहिल्या सामन्यात 29 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. तर सुंदरने 27 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 27 धावा केल्या.
या सामन्यात गायकवाडने सात, परागने दोन, रिंकू सिंगने शून्य, जुरेलने सहा, बिश्नोईने नऊ, आवेशने 16, मुकेशने शून्य धावा केल्या. तर, खलील खाते न उघडता नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून चतारा आणि कर्णधार रझा यांनी प्रत्येकी तीन तर बेनेट, वेलिंग्टन, मुझाराबानी आणि ल्यूक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ICC Player of the Month Awards : रोहित-बुमराहला ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकन…
तत्पूर्वी, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर झिम्बाब्वेने पहिल्या डावात फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या.
यादरम्यान ब्रायन बेनेट 15 चेंडूत 22 धावा करून तर कर्णधार सिकंदर रझा 19 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. मेयर्सने सर्वाधिक 23 धावांची खेळी केली. या काळात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अप्रतिम होती. टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने चार विकेट घेतल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने दोन, मुकेश कुमार आणि आवेश खानने प्रत्येकी एक विकेट घेतली