गयाना – भारतीय संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईटवाॅश दिल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय मालिकेला गुरूवारपासून (8 ऑगस्ट) सुरूवात झाली, मात्र पहिलाच सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
Not the kind of outcome one would have wanted with play suspended due to rain. We move on to Trinidad next #TeamIndia #WIvIND pic.twitter.com/dL1DDE8wWO
— BCCI (@BCCI) August 8, 2019
दरम्यान, भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली होती. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस सुरू होता. त्यामुळे विलंब झाल्याने सामना 43 षटकांचा करण्यात आला होता. परंतु त्यानंतर देखील तीन वेळा पावसाचा अडथळा आल्याने 13 षटकानंतरच पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेस्ट इंडिजने 1 गडी गमावत 54 धावा केल्या होत्या. मालिकेतील दुसरा सामना 11 ऑगस्टला पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगणार आहे.