Indian Team Leaves For Sri Lanka : भारतीय संघाचा पुढील मोहीम श्रीलंका दौरा आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे. संघातील अनेक खेळाडू मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत दिसले. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची ही पहिलीच जबाबदारी असेल.
न्यूज एजन्सी ‘एएनआय’ (ANI) ने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरसह अनेक खेळाडू श्रीलंकेला रवाना होत आहेत. व्हिडिओमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर प्रथम दिसत आहेत. यानंतर संजू सॅमसन आणि रवी बिश्नोई यांच्यासह अनेक खेळाडू बसमध्ये चढताना दिसले.
INDIAN TEAM LEAVING TO SRI LANKA…!!!!
– It’s time for Gambhir 🤝 Surya in T20I. 🇮🇳 pic.twitter.com/DDKn5pcuZ4
— Johns. (@CricCrazyJohns) July 22, 2024
श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियामध्ये दिसतील ‘हे’ मोठे बदल….
मुख्य प्रशिक्षक : गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. यापूर्वी, राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक होते, ज्याचा कार्यकाळ 2024 टी-20 विश्वचषकानंतर संपला होता.
रोहित आणि विराट दिसणार ODI मालिकेत – टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली फक्त एकदिवसीय मालिकेत दिसणार आहेत.
सूर्यकुमार यादव असणार टी-20 चा कर्णधार – रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. यापूर्वी हार्दिक पांड्याकडे कर्णधार म्हणून पाहिले जात होते, परंतु खराब फिटनेस रेकॉर्डमुळे हार्दिक कर्णधार बनू शकला नाही. तर शुभमन गिलला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
येत्या 27 जुलैपासून मालिकेस प्रारंभ – भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून सुरु होणारी पहिली 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 02 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होईल. वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 07 ऑगस्ट रोजी होणार आहे.