IND vs SL 2nd T20 (Toss Update) : भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे लक्ष्य 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याचे असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पल्लेकेले येथे खेळवला जात आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागणार आहे.
India Won the Toss & elected to Field https://t.co/R4Ug6MReOu #SLvIND #2ndT20I
— BCCI (@BCCI) July 28, 2024
दरम्यान, दरम्यान, टीम इंडियाने मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या इराने टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही भारतासाठी विजय सोपा असणार नाही.
पहिल्या T20 मध्ये भारतीय संघाने 20 षटकात 7 विकेट गमावत 213 धावा केल्या होत्या . प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत 170 धावांवर गारद झाला.