IND vs SA 3rd T20 : तिलक वर्माचे तूफानी शतक आणि अभिषेक शर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या टी-20 सामन्यात विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर भारताने 20 षटकांत 6 बाद 219 धावसंख्येपर्यत मजल मारली. भारतासाठी, तिलक वर्मा याने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय संघ 200 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला.
𝙄𝙣𝙣𝙞𝙣𝙜𝙨 𝘽𝙧𝙚𝙖𝙠!
A power-packed unbeaten TON from Tilak Varma 💪
A quickfire half-century from Abhishek Sharma ⚡️#TeamIndia post 219/6 on the board 👏Over to our bowlers now 👍
Scorecard ▶️ https://t.co/JBwOUCgZx8 #SAvIND | @TilakV9 | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/iUNnLLs9w0
— BCCI (@BCCI) November 13, 2024
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीच्या षटकातच संजू सॅमसनची विकेट गमावली. सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात खातेही न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर अभिषेक आणि तिलक यांनी डावाची धुरा सांभाळली आणि दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक बाद झाला. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने 25 चेंडूत 50 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार मारले. अभिषेक बाद झाल्यानंतर तिलकने आपली खेळी सुरू ठेवत आधी अर्धशतक केले आणि नंतर शतक झळकावण्यातही यश मिळवले.
तिलक 56 चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 107 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने एका धावेचे, हार्दिक पंड्याने 18 धावांचे, रिंकू सिंगने आठ धावांचे आणि रमणदीप सिंगने 15 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी अक्षर पटेल एक धाव काढून नाबाद परतला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अँडिले सिमेलेने आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय मार्को जॅनसेनला 1 यश मिळाले. तर जेराल्ड कोएत्झी, लुथो सिम्पाला आणि कर्णधार एडन मार्कहॅम यांना यश मिळाले नाही.