गुवाहाटी – टीम इंडियामध्ये सध्या दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) आणि ऋषभ पंत ( Rishabh Pant ) यांच्या जागेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्तिकला संघात खेळवले तर पंतला संधी दिली जात नाही असे म्हटले जाते, तर दिनेश कार्तिककडे ( Dinesh Kartik ) संघ फिनिशर म्हणून पाहतो त्यामुळे त्यालाही संघाबाहेर बसवणे कठीण आहे. याव्यतिरिक्त दोघानांही जर सामन्यात खेळवले तर दोन यष्टीरक्षक का खेळवत आहेत, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र भेदभाव नको म्हणून कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे दोघांनाही संधी देत आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) आणि ऋषभ पंत ( Rishabh Pant ) आपली निवड होणार की नाही याकडे लक्ष न देता नेट्समध्ये जोरदार सराव करत आहेत. सरावादरम्यान दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत आपल्या खेळाविषयी चर्चा करताना पाहायला मिळाले.
महत्वाचं म्हणजे ऋषभ पंतने ( Rishabh Pant ) दिनेश कार्तिकला नेहमीच आपला गुरू मानल आहे. दिनेश कार्तिकने ( Dinesh Kartik ) टीम इंडियासाठी पदार्पण केले तेव्हा ऋषभ फक्त ७ वर्षांचा होता. त्यामुळे भारतीय संघात खेळताना दिनेश कार्तिककडून यष्टिरक्षण आणि फलंदाजीचे धडे घेण्यासाठी ऋषभ पंत नेहमीच तयार असतो.
रविवारी टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात मालिकेतील दुसरा टी-२० सामना गुवाहाटीत खेळला जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी खेळाडूंनी नेट्समध्ये कसून सराव केला. सरावादरम्यान ऋषभ पंत ( Rishabh Pant ) उमेश यादवच्या बाऊन्सर गोलंदाजीवर सराव करताना दिसला. दिनेश कार्तिक ( Dinesh Kartik ) आपला सराव संपवून ऋषभकडे पोहोचला आणि त्याला फलंदाजीबाबत काही टिप्स दिल्या. त्यावेळी ऋषभ पंत एखाद्या विद्यार्थ्यांसारखा कार्तिक सांगत असलेल्या गोष्टी ऐकत होता. ( Ind vs Sa T20i Serise Dinesh Kartik And Rishabh Pant practis net Session )
कार्तिक आणि पंतमधील हे संभाषण पाहून चाहते त्यांच्यावर जाम खुश झाले आहेत. कारण दोघही एकमेकांविरुध्द स्पर्धा करत नसून आपल्या खेळाकडे लक्ष देत आहेत. आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात दोन्हीही खेळाडूंना स्थान देण्यात आलेलं आहे.