नवी दिल्ली : टी20 विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांच्या समोर ठाकणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचत पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठली आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिसऱ्यांदा धडक मारली आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत होणार आहे.
कुणाचे पारडे जड?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये शनिवारी टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघ कोणत्याही परिस्तिथीमध्ये फायनल जिकंण्यासासाठी प्रयत्न करणार आहेत. भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आणि विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिक दोन्ही संघ या स्पर्धेत अजय आहेत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आतापर्यंत 26 टी20 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 14 वेळा पराभव केलाय, तर 11 सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिका न्यूट्रल ठिकाणी दोन वेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्हीवेळा टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या तरी भारत वरचढ असल्याचे पाहायला मिळत आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेईंग 11
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को यानसन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि तरबेज शम्सी