भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १६ धावांनी पराभव करत ही टी-२० मालिका जिंकली आहे. दरम्यान, बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारपासून खेळल्या जाणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ही एकदिवसीय सामन्यांची मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. महत्वाचं म्हणजे पृथ्वी शॉला या संघात स्थान मिळालेले नाही.
जाहीर करण्यात आलेल्या संघात मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर इशान किशन आणि संजू सॅमसन यांचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पृथ्वी शॉला या संघात स्थान मिळालेले नाही. निवड न झाल्याने त्याने याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्याने लिहिले की, ‘त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, त्यांनी घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेवा. कारण शब्दांना नव्हे तर कृतीला महत्त्व आहे.’
पृथ्वी शॉने त्याच्या या पोस्ट मधून कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही. मात्र साऊथ आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड न झाल्याने त्याच्या मनात असलेली नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘पृथ्वी शॉला त्याच्या दुखापतीमुळे बाहेर ठेवले असेल तर ठीक आहे. मात्र याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे त्याला दुर्लक्षित केले जात असेल तर त्याचे स्पष्टीकरण द्यावे’.
पृथ्वी शॉने मागील महिन्यात न्यूझीलंड अ संघाविरुध्द्व एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने दोन सामन्यात ९४ धावा काढल्या होत्या. त्यामुळे त्याला या मालिकेसाठी संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता होती. ( IND vs SA ODI Serise 2022 Prithvi Shaw did not get a place in the Indian team )
Presenting to you 🇮🇳’s ODI squad against 🇿🇦
Thoughts, Paltan? 🧐#OneFamily #INDvSA @BCCI @ishankishan51 pic.twitter.com/qDbWYIJuuR
— Mumbai Indians (@mipaltan) October 3, 2022