Shubman Gill – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शुभमन गिल आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली होती. सामन्यात भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी निराशा केली. कारण धवन आणि गिल यांना भारताला चांगली सुरुवात करून देता आली नाही. शुभमन गिल ७ चेंडूचा सामना करत फक्त ३ धावा करून तंबूत परतला होता. मात्र यावेळी गिलने ३ धावा करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
गिलने ( Shubman Gill ) त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत ५०० धावांचा टप्पा गाठला आहे. महत्वाचं म्हणजे भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने या धावा सर्वात कमी सामन्यात केल्या आहेत. शुभमन गिलने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीच्या १०व्या डावात ही कामगिरी केली आहे. यामध्ये त्याने ९ सामने विदेशी खेळपट्टीवर खेळले आहेत, तर १ सामना मायदेशात खेळाला आहे.
शुभमन गिलने ( Shubman Gill ) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१ जानेवारी २०१९ रोजी न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले होते. हॅमिल्टन येथील न्यूझीलंड विरुद्धच्या त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त ९ धावा केल्या होत्या. गिलने भारतासाठी आतापर्यंत १० एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये त्याने ६२.७५ च्या सरासरीने एका शतकासह ५०२ धावा केल्या आहेत. गिलची एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम धावसंख्या १३० धावा अशी आहे.
Shubman Gill becomes quickest Indian to reach 500 ODI runs. #INDvSA pic.twitter.com/9sPKKOSrGU
— Shubman Gill FC (@shubmangillfans) October 6, 2022