IND vs SA 3rd T20 (Playing XI Update) : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी 20 सामना हा सेंच्युरियन येथे होणार आहे. उभयसंघ या 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकून कोणता संघ आघाडी घेणार? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल.
दरम्यान, तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं लागला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण-गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (South Africa Won the toss and elected to field) त्यामुळे भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावं लागेल.
🚨 Toss Update 🚨
South Africa win the toss and elect to field in the 3rd T20I.
Live – https://t.co/JBwOUChxmG#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/wpBD80HHRg
— BCCI (@BCCI) November 13, 2024
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. गोलंदाज आवेश खानच्या जागी रमणदीप सिंगचा समावेश करण्यात आला आहे. या सामन्यातून रमणदीप टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.
IND vs SA : दोन्ही संघांची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : रायन रिक्लेटन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्क जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला.
भारतीय संघाने मालिकेतील पहिला टी-20 सामना 61 धावांनी जिंकला होता. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या टी-20मध्येही विजयाच्या जवळ पोहोचली, पण शेवटी गेराल्ड कोएत्झी आणि ट्रस्टन स्टब्स यांनी सामन्याचं चित्र पालटून टाकताना दक्षिण आफ्रिकेला गमावलेला सामना जिंकून दिला.
दरम्यान, दुसऱ्या लढतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजाकडून बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 लढतीमध्ये भारतीय फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर 2009 पासून भारताने केवळ एकच लढत खेळली असून 2018 साली झालेल्या या लढतीमध्ये भारताला 6 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या संघातील हार्दिक पांड्या हा एकमेव खेळाडू सध्या संघात आहे.
Gujarat Titans : गुजरात टायटन्सचा IPL 2025 पूर्वी मोठा निर्णय, पार्थिव पटेलला दिली मोठी जबाबदारी…
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
टीम इंडिया या मालिकेत चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला जियो सिनेमा (Jio Cinema) ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.