भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी के एल राहुलला कर्णधार बनवण्यात आले आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. दरम्यान, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Toss Update – KL Rahul has won the toss and elects to bat first in the 2nd Test.
Captain Virat Kohli misses out with an upper back spasm.#SAvIND pic.twitter.com/2YarVIea4H
— BCCI (@BCCI) January 3, 2022
विराट कोहली या सामन्यात खेळणार नाही. दुर्दैवाने विराटच्या पाठीच्या वरच्या भागात क्रॅम्प आहे आणि पुढच्या कसोटीत तो बरा होईल अशी आशा आहे. नाणेफेक दरम्यान केएल राहुल अशी माहिती दिली आहे.
पुढे राहुल म्हणाला की, आपल्या देशाचे नेतृत्व करणे हे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते. आम्ही येथे काही चांगले विजय मिळवले आहेत आणि आशा आहे की आम्हाला हा विजय पुढे असाच सुरू ठेवायची आहे. अशा आव्हानाची आम्ही वाटच पाहत होते. विराटच्या जागी हनुमा विहारी आला आहे. संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याने 113 धावांनी विजय मिळवला होता. टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये विजय मिळवला तर ते मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेईल आणि आफ्रिकन भूमीवर पहिली कसोटी मालिका जिंकेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, एम. शमी, जसप्रीत बुमराह, एम. सिराज
दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर, एडन मार्कम, कीगन पीटरसन, व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल व्हर्न (विकेटकीपर), मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी