IND vs SA 2nd T20 (Score Update) :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 125 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 124 धावा केल्या.
Innings Break! #TeamIndia post 124/6 on the board in the second T20I!
Over to our bowlers! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/ojROEpNnzy #SAvIND pic.twitter.com/BVH8RycFzN
— BCCI (@BCCI) November 10, 2024
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. अभिषेक शर्मा 5 चेंडूत 4 धावा करून बाद झाला तर पहिल्या सामन्यातील शतकवीर संजू सॅमसन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर नजरा खिळल्या होत्या, मात्र त्याने निराशा केली. सूर्यकुमार सुध्दा 9 चेंडूत 4 धावा करून माघारी परतला.
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत या काळात भारताला 4 षटकात 15 धावांवरच तीन धक्के दिले. भारतीय संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून शेवटपर्यंत सावरता आले नाही, पण हार्दिकच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लढाऊ धावसंख्या गाठण्यात यश आले. भारताकडून अष्टपैलू हार्दिक पांड्याने 45 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 39 धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त अक्षर पटेलने 21 चेंडूत 27 तर तिलक वर्माने 20 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगही अपयशी ठरला. तो 11 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. अर्शदीप सिंह 6 चेंडूत 7 धावा करून नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, अँडी सिमेलॉन, एडन मार्कराम आणि एन. पीटरने 1-1 विकेट घेतली. मार्को यानसेनने 4 षटकांत 25 धावांत 1 खेळाडू बाद केला. तर जेराल्ड कोएत्झीने 4 षटकात 25 धावा देत 1 बळी मिळवला.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
दरम्यान, भारताने पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. अशाप्रकारे भारतीय संघ 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने दमदार कामगिरी करताना केवळ 50 चेंडूत शतकी खेळी केली होती. तर गोलंदाजीत रवी बिष्णोई व वरून चक्रवर्तीने प्रत्येकी 3 फलंदाज तंबूत पाठवले होते.