India vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. हा सामना सेंट जॉर्ज पार्क स्टेडियम, गकेबेहारा येथे होणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार विजयाची नोंद केली. आता दुसऱ्या सामन्यासाठी संघ सज्ज आहे. चाहत्यांना हा सामना विनामूल्य पाहता येणार आहे. ते टीव्हीसह मोबाइल ॲपवर पाहता येईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्याची वेळ वेगळी असेल.
IND vs SA : सामन्याची वेळ काय…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना आज (रविवार, 10 नोव्हेंबर) सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर पहिला सामना रात्री 8.30 पासून खेळवण्यात आला. पहिला सामना डर्बन येथे झाला. या कारणास्तव त्याची वेळ वेगळी होती.
IND vs SA : सामना विनामूल्य कोठे पाहू शकाल….
टीम इंडिया या मालिकेत चार सामने खेळणार आहे. स्पोर्ट्स 18 (Sports 18) आणि कलर्स सिनेप्लेक्स (Colors Cineplex) या टीव्ही वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. जर प्रेक्षकांना दुसरा टी-20 सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर तेही शक्य आहे. यासाठी तुम्हाला जियो सिनेमा (Jio Cinema) ॲप डाउनलोड करावे लागेल. येथे तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.
IND vs SA : दुसऱ्या T20 दरम्यान हवामान कसे असेल?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्याच्या दिवशी हवामान थंड राहू शकते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पावसाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.
IND vs SA 1st T20 : टीम इंडियानं डर्बन गाजवलं, पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला 61 धावांनी लोळवलं…
संजूचे धमाकेदार शतक….
भारताने टी-20 मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसनने धमाकेदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूंचा सामना करत 107 धावा केल्या. सॅमसनच्या या खेळीत 10 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. टिळक वर्माने 18 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. अशा प्रकारे भारताने 202 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 141 धावा करून सर्वबाद झाला. बिश्नोई आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.