नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या विश्वचषक सामन्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमींची उत्सुकता चरणसीमेवर आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. परंतु, या मताशी इंग्लड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन हे सहमत नाही. वॉन यांच्या मतानुसार, १६ जून रोजी मॅनचेस्टर येथे होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान सहजगत्या विजय प्राप्त करेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.
विश्वचषकाबाबत भविष्यवाणी करताना मायकल वॉन यांनी म्हंटले कि, पाकिस्तान सहजगत्या जिंकेल. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लड आणि भारत यापैकी एक संघ विश्वचषक सामना जिंकेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
Easy win for Pakistan .. 😉 https://t.co/VAPWj6boIX
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 14, 2019
दरम्यान, भारत-पाकिस्तामध्ये विश्वचषकात आतापर्यंत सहा सामने खेळविण्यात आले आहेत. परंतु, नेहमीच पाकिस्तानला पराभवाचा सामान करावा लागला आहे. हे माहित असूनही आणि विराट सेना सध्या फॉर्मात असल्याने वॉन यांची भविष्यवाणी थोडी आश्चर्यचकित करणारी आहे. तसेच हा सामना भारताने जिंकला तर पाकिस्तान आणि मायकल वॉन यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागणार हे निश्चित.