मुंबई – टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला.
सध्या सोशल मीडियावर या सामन्यासंदर्भात बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट विश्लेषक ‘केआरके’ याचं ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या पराभवानंतर त्याने सोशल मीडियावर ट्विटचा भडीमार केल्याचे दिसून येत आहे.
Today, I watched Pakistan team playing after 5-6 years, So I didn’t know that it’s so good. So I am really sorry for comparing it with Juhu Gali team. #IndvsPak #ICCT20WorldCup2021
— KRK (@kamaalrkhan) October 24, 2021
केआरकेने पंतप्रधान मोदींचा हाताची घडी घालून असलेला एक फोटो ट्विट करत मोदींवरही निशाणा साधलाय. “मोदी सर जे याआधी कधीच झालं नाही ते सुद्धा तुमची सत्ता असताना घडलंय. मोदी है तो मुमकिन है..!’ असं केआरकेने म्हटलं आहे.
Modi Sir Ji Jo Kabhi Pahle Nahi Huwa, Aapke Raaj Main Woh Bhi Ho Gaya! Modi hai toh mumkin hai. pic.twitter.com/GrqGUpPqAF
— KRK (@kamaalrkhan) October 24, 2021
तर आपल्या पुढच्या ट्विटमध्ये त्याने अभिनेता अक्षय कुमारला पनौती म्हंटलं आहे. “अक्षय कुमार तू भारत पाक सामना पाहण्यासाठी मैदानावर का गेलास? “मला विश्वास बसत नाहीय की पनौती हा शब्द अक्षय कुमार सरांमुळे चर्चेत आहे. सर तुम्ही तर चर्चेत आलात. असंही कमाल आर खानने म्हटलंय.
I can’t believe that #पनौती #Panauti are trending because of sir @akshaykumar! Sir Aap Toh Chaa Gaye! #IndvsPak #WorldCupT20 #ICCT20WorldCup2021 #TeamIndia
— KRK (@kamaalrkhan) October 24, 2021