IND vs NZ – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ नोव्हेंबरला पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले तर उपकर्णधार म्हणून ऋषभ पंत दिसणार आहे. या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. कारण त्याला अनेकजण टी-२० संघाचा नियमित कर्णधार बनवण्याची मागणी करत आहेत.
“विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक दर्जाचा खेळाडू”,स्टीव्ह स्मिथचं भाष्य!
टी-२० विश्वचषकात विराट कोहलीसह सूर्यकुमार यादवनेही चांगली कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत तीन अर्धशतकांसह २३९ धावा केल्या होत्या. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या ( IND vs NZ ) सामन्यात सूर्यकुमारची कामगिरी कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या दोघेही विश्वचषक स्पर्धेत चांगल्या लयीत खेळत होते. त्यामुळे ही जोडी न्यूझीलंडची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असून तो त्याच्या या स्थानाला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे युवा खेळाडूंना त्यांच्या कौशल्याची ओळख संपूर्ण जगाला करून देण्याची चांगली संधी आहे.
भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला ( IND vs NZ ) या मालिकेत किती सामने खेळणार मिळणार हे नक्की नाही. मात्र त्याच्या गोलंदाजीकडे सर्वांचेच लक्ष असेल. कारण तो ज्या वेगाने गोलंदाजी करतो, तशाच गोलंदाजाची सध्या भारतीय संघाला गरज आहे. विश्वचषकात भारतीय संघाला चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता नक्कीच भासलेली आहे. संघ व्यवस्थापनानेही उमरानकडे खास लक्ष देऊन त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करायला हवा.
India’s interim coach has praised Hardik Pandya’s leadership abilities ahead of the T20I series against New Zealand 💬 #NZvIND https://t.co/PBxYippRJF
— ICC (@ICC) November 17, 2022
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
भारत – शुभमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, हर्षल पटेल.