भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना रांची येथे खेळला गेला. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने सकारात्मक सुरुवात केली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने विजय मिळवला तेव्हा 20 चेंडू बाकी होते.
And a fan stormed into the field!!! The fellow sitting beside me, “ab maar khaaye chahe jo ho uska Sapna poora ho gaya! Ab yeh Ranchi mein Hatia mein Jharkhand mein poore India mein famous ho gaya!!” #IndiaVsNewZealand #INDVsNZT20 #fans #CricketTwitter pic.twitter.com/6NsIQDY0fO
— Sunchika Pandey/संचिका पाण्डेय (@PoliceWaliPblic) November 19, 2021
भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली. टीम इंडिया जेव्हा फिल्डिंग करत होती तेव्हा या मॅचमध्ये एक अप्रतिम नजारा पाहायला मिळाला. रोहित शर्माच्या एका चाहत्याने चक्क सुरक्षा व्यवस्था तोडत मैदानावर जाऊन रोहितच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
कडेकोट सुरक्षा भेदून रोहितचा चाहता पोहोचला मैदानात
न्यूझीलंडची बॅटींग सुरू होती त्यावेळी रोहित शर्मा मैदानावर फील्डिंग करत होता. यावेळी रोहित मैदानावर उपस्थित असताना त्याचा चाहताही त्याच बाजूला होता. हिटमॅनच्या चाहत्याने सुरक्षा व्यवस्थेला बगल देत मैदानात घुसून रोहितला गाठले. यादरम्यान त्याला रोहितच्या पायाला हात लावायचा होता पण हिटमॅनने त्याला दुरूनच तसे करण्यास सांगितले.
यानंतर चाहत्याने जमिनीवर पडून रोहित शर्माला नमस्कार केला. रोहितने चाहत्याला सांगितले की हा कोविडचा काळ आहे आणि जर त्याला बाहेरील व्यक्तीने कोणी स्पर्श केला तर त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. कारण बायो-बबलची वेळ आली आहे ज्याला क्रिकेटर्स खूप गांभीर्याने घेत आहेत.
यादरम्यान सुरक्षा रक्षकही रोहितच्या चाहत्याचा पाठलाग करताना दिसले. मात्र त्याला पकडण्याआधीच रोहितचा चाहता मैदानाबाहेर पडला. हिटमॅनच्या या चाहत्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.